अकोले – अकोले येथे तहसील कचेरीत आज 21 ग्रामपंचायतींच्या निवडणूक अर्जांची छाननी झाली. त्यात सरपंचपदाचे 9 अर्ज बाद झाले. तर सदस्यपदाचे 23 अर्ज बाद झाले.एकूण 32 अर्ज बाद झाल्याने सरपंचपदासाठी 91 व सदस्यपदासाठी 175 अर्ज शिलकी राहिले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार जगदीश गाडे यांनी दिली.
अर्जात आवश्‍यक ती पूर्तता न करणे, अपत्य प्राप्ती आणि अन्य काही माहितीची लपवाछपवी करणे यातून हे अर्ज बाद झाले आहेत. यावेळी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले गेले.
सरपंच पदाचे गावे व बाद अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे : देवगाव-2, मुतखेल-2, पाचनई-1, शिसवद-2, पिंपळदरावाडी-2 असे एकूण 9 अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे सरपंच विभागात एकूण 91 अर्ज शिलकी राहिले आहेत.
सदस्यपदाचे गावे व बाद अर्ज पुढीलप्रमाणे : देवगाव-2, मुतखेल-3, रतनवाडी-1, पिंपळदरावाडी-7, कुमशेत-3, पेंडशेत-1, सुगाव बुद्रुक-1, पाचनई-3, आंबीत-शिरपुंजे : 1, शिसवद-1. असे एकूण 23 अर्ज बाद झालेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य या भागात 175 अर्ज शिलकी राहिले आहेत. 15 तारखेला माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)