2022 फुटबॉल विश्वचषकाच्या मैदानाचे रेखाचित्र तयार

लुसेल: कटरमध्ये होणारा 2022चा फुटबॉल विश्वचषक हा संपूर्ण सामने मध्य आशियात होणारा पहिला विश्वाचसकक ठरणार आहे. यातील काही मैदानाचे काम पूर्णत्वास येत असून अंतिम सामना ज्या मैदानावर खेळवाला जाणार आहे त्या लुसेल मैदानाचे रेखाचित्र तयार झाले आहे. त्याच्या अनावरणाच्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव अंतोनिओ गुटारेस आणि कतारचे हुकूमशाह शेख तमिम बिन हमाद अल-थानी यांनी हजेरी लावली होती.

यावेळी बोलताना कतार विश्वचषक संयोजन समितीचे मुख्य हसन अल थवादी म्हणाले, या विश्वचषकासंबंधी होणारी प्रत्येक मोठी घटना आमच्यासाठी अतिमहत्वाची आहे. त्याचप्रकारे या शेवटच्या मैदानाची रेखाकृती तयारीची घटना ही देखील आमच्यासाठी महत्वाची आहे. हे सामने होणारे आठवे आणि शेवटचे मैदान आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच मैदानावर कतार विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)