2021 ची चॅम्पियन्स ट्रॉफी टी-20 प्रकारात खेळवा, आयसीसीचा प्रस्ताव 

दुबई  – टि-20 क्रकेटच्या वाढत्या प्रभावा समोर निरस ठरत चाललेल्या एकदीवसीय क्रिकेट मधील महत्वाची माणली जाणारी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आता टि-20 प्रकारात खेळवली जावी असा प्रस्ताव आयसीसीने आपल्याशी संलग्न देशांसमोर ठेवला आहे.
2021 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचे हक्क भारताला देण्यात आलेले आहेत. मात्र 2013 व 2017 साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत झालेलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी व भविष्यात स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्यासाठी आयसीसीने टी-20 सामने भरवण्याचा प्रस्ताव दिल्याचं समजतं आहे.
मध्यंतरीच्या काळात करसवलतीच्या मुद्‌द्‌यावरुन आयसीसीने 2021 साली होणारी ही स्पर्धा भारताबाहेर नेण्याची तयारी सुरु केली होती. आता स्पर्धा टी-20 प्रकारत खेळवावी असा प्रस्ताव आयसीसीने दीला असुन बीसीसीआयने याला स्पष्ट नकार दिलेला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु करण्यात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे दालमिया यांच्या स्मरणार्थ बीसीसीायने 2021 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं निश्‍चीत केल्याचं समजतंय. त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआयच्या या शीतयुद्धात नेमकं कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)