2020 पर्यंत व्यसनमुक्‍त महाराष्ट्र जाहीर करा

100 संस्थांच्या मंचाची मागणी: दारुमुळे दरवर्षी साडेतीन लाख लोक मृत्यूमुखी
पुणे  – राज्यातील 98 गावांच्या सर्व्हेक्षणातून पुढे आलेल्या निष्कर्षानुसार राज्यात दरवर्षी साडेतीन लाख लोक दारुमुळे मृत्यूमुखी पडतात तर यामुळे 45 हजार कुटुंब दरवर्षी उद्वस्त होतात. त्यामुळेच राज्य सरकारने महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाकडे वाटचाल करताना 2020 पर्यंत व्यवनमुक्‍त महाराष्ट्र जाहीर करावा अशी मागणी शंभर संस्था व संघटनांनी एकत्र येत तयार झालेल्या व्यसन मुक्‍त महाराष्ट्र मंचाकडून करण्यात आली आहे.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, व्यसनमुक्‍त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन राज्यात अनेक संस्था व संघटना कमा करत आहेत. महाराष्ट्र राज्य लवकरच हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रालाही 2020 पर्यंत व्यसनमुक्‍त करण्यासाठी धोरण आणावे. व्यसनांची उपलब्धतता टप्प्याटप्याने कमी करुन युवा पिढीला यापासून वाचवावे. आमच्या या मागण्यांसाठी गेली दोन अधिवेशनांदरम्यान धरणे, सत्याग्रह, आंदोलने केली आहेत. तसेच सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनीही व्यसनमुक्‍त महाराष्ट्र 2011 च्या धोरणानुसार सकारात्मकता दर्शविली असल्याचे पाटील यीां यावेळी सांगितले.

98 गावांच्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष
– पूर्ण राज्यात दारु, तंबाखू, गुटखा, तपकीर, खर्रा, सिगारेट, अफु, गांजा, ताडी, खर्रा आदी प्रकारची व्यवनांची उत्पादने सहज उपलब्ध आहेत.
– राज्यातील किमान 4 कोटी नागरिक वरीलपैकी कोणत्या ना कोणत्या व्यसनात अडकलेले आहेत.
– दरवर्षी सुमारे 3 लाख 53 हजार 584 पेक्षा जास्त नागरिक दारुच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात तर 45 हजार कुटुंब यामुळे उद्वस्त होतात.
– राज्यात दारु विक्रेत्यांची संध्या साधारणपणे 12 ते 12.50 लाख आहे असून हे लोख वैध व अवैध दारु विक्री करतात. त्यातील ग्रामीण भागात अवैध दारुविक्री होते.
– राज्यातील 60 टक्‍के नागरिकांचे मत आहे की दारुसारख्या व्यसनांमुळे गावावस्त्यांमध्ये मोठी भांडणे, महिलांवर बलात्कार, अत्याचार, शोषण होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)