पालघर नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा; नगराध्यक्षपद मात्र राष्ट्रवादीकडे

पालघर – पालघर नगरपरिषद निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं आहे, मात्र नगराध्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.

पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. याठिकाणी भाजप-शिवसेना-रिपाइं युतीने 21 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला 2 तर अपक्षांना 5 जागी विजय मिळाला आहे.

नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या उज्ज्वला केदार काळे यांनी 1069 मतांनी विजय मिळवला आहे. नगराध्यक्षापदीच्या लढतीत त्यांच्या विरूध्द शिवसेनेतर्फे श्वेता मकरंद पाटील, अपक्ष उमेदवार अंजली पाटील या रिंगणात होत्या. मात्र उज्ज्वला काळे यांनी बाजी मारल्याने नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1110137334866083840

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)