संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – आगामी वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अमित शहा हेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शहा यांचा कार्यकाल जानेवारीमध्ये संपणार आहे. पण भाजपच्या आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणींच्या बैठकी दरम्यान ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शहा यांनी अध्यक्षापदावर कायम रहावे’, असा निर्णय घेतला गेल्याचे समजते आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपा सार्वत्रिक निवडणुका संपण्यापूर्वी संघटनात्मक निवडणुकाचे आयोजन करणार नाही अशी माहिती मिळत आहे.

याआधी दिल्लीमध्ये शुक्रवारी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीआधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस संबोधित करताना अमित शहा यांनी म्हटले की, ‘आपण पूर्ण बहुमत घेऊन परत सत्तेवर येऊ, कारण संकल्पाच्या शक्तिला कोणीही पराभूत करू शकत नाही’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)