हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली – 28 नोव्हेंबरपासून ओडीशातील भुवनेश्वर येथे सुरु होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली असून या 18 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व मनप्रीत सिंहकडे सोपवण्यात आलेले असून, या संघात अनुभवी ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि आघाडीच्या फळीतला खेळाडू एस.व्ही.सुनिल यांना वगळण्यात आले असल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसला आहे.

राष्ट्रीय शिबिरादरम्यान सुनीलचा गुडघा दुखावला होता. त्यामुळे त्याचा सहभाग अनिश्‍चितच मानला जात होता. दुसरीकडे, रुपिंदरपालसिंगला पुन्हा एकदा दृर्लक्षित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी स्पर्धेतही रुपिंदरपालसिंगला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. तर पी. आर. श्रीजेश आणि कृष्णा बहादूर पाठक हे संघाचे गोलरक्षक असतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपकर्णधारपद चिंगलेनसानासिंग कांगुजमकडे सोपविण्यात आले आहे. ओडिशाचा अनुभवी बचावपटू बिरेंद्र लाक्राचे संघात पुनरागमन झाले असून त्याच्या सोबत हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, कोठाजीत सिंह सुरेंद्र कुमार आणि अमित रोहिदासयांचा समावेश असणार आहे.

तर, या वेळी आघाडीच्या फळीत आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, ललित कुमार उपाध्याय आणि सिमरनजीत सिंहयांचा समावेश करण्यात आला होता. तर, मधल्याफळीची जबाबदारी मनप्रीत सिंह, चिंगलेन साना सिंग, निलकांत शर्मा, हार्दिक सिंह, सुमीत यांच्या कडे असणार आहे.

विश्‍वचषकासाठी असा असेल भारतीय संघ –
गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक
बचावफळी – हरमनप्रीत सिंह, बिरेंद्र लाक्रा, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास
मधली फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), चिंगलेन साना (उप-कर्णधार), निलकांत शर्मा, हार्दिक सिंह, सुमीत
आघाडीची फळी – आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)