2018 मध्ये तिन्ही खान नापास

आमिर, शाहरुख आणि सलमान या बॉलीवूडमधील तिन्ही खान मंडळींसाठी 2018 हे वर्ष पैसे कमावण्याच्या दृष्टीने फारसे चांगले गेले नाही. या तिघांनाही बॉक्‍स ऑफिसवर हिट सिनेमा मिळाला नाही. त्यांचे जे सिनेमे रिलीज झाले त्यामधून खूप काही धंदा झाला आहे, असेही म्हणता येऊ शकणार नाही. उलट या तिघांच्याही वाट्याला फ्लॉप सिनेमांची यादीच मिळाली आहे. 2018 वर्षात सर्वात हिट सिनेमांच्या यादीमध्ये या तिघांपैकी कोणाचाही कोणताही सिनेमा येऊ शकलेला नाही. कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर “संजू’, दुसऱ्या क्रमांकावर “पद्‌मावत’ आणि तिसऱ्या क्रमांकावर “सिंबा’ या सिनेमांचा क्रमांक लागला. “संजू’ने 342 कोटी, “पद्‌मावत’ने 302 कोटी तर, “सिंबा’ने आतापर्यंत 190 कोटी रुपयांचा धंदा केला आहे.

त्याच्या तुलनेत सलमानच्या “रेस 3’ने 166 कोटी, आमिर खानच्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ने 151 कोटी तर शाहरुख खानच्या “झिरो’ने अजूनही 100 कोटी रुपयांची कमाई केलेली नाही. “झिरो’ अजूनही कसाबसा थिएटरवर टिकून आहे. पण 88 कोटींच्या आसपास त्याची कमाई आहे. तिन्ही खान मंडळींनी आपापले महत्त्वाकांक्षी सिनेमे ईद, दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुटीच्या मुहुर्तावर रिलीज केले होते. प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने या सिनेमांच्या प्रमोशनसाठी भरपूर खर्चही केला होता. आपल्या सिनेमाला वर्षभरातील सर्वात हिट सिनेमा म्हणून गणले जावे यासाठी तिघांनीही अन्य कोणत्याही प्रोजेक्‍टवर कामदेखील केलेले नव्हते. उलट आपल्या सिनेमाच्या प्री रिलीज पब्लिसिटीवरच अधिक लक्ष केंद्रित केले होते. सुमारे दशकभरापूर्वी तिघेही खान वर्षभराच्या यशस्वी सिनेमाच्या चढाओढीमध्ये होते. तेंव्हा हृतिक रोशनच्या “धूम 2’ने सर्वाधिक 85 कोटी, संजय दत्त आणि अर्शद वारसीच्या “लगे रहो मुन्नाभाई’ने 75 कोटी आणि पुन्हा हृतिक रोशनच्याच “क्रिश’ने 72 कोटी रुपयांची कमाई करून तिसरा क्रमांक मिळवला होता. आता त्यापेक्षा दुप्पट कमाई करूनही तिन्ही खान वर्षभराच्या रेसमध्ये नापास झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)