2011 पर्यंतच्या झोपडण्यांना संरक्षण

पुणे – पुण्यासह राज्यातील 2011 पर्यंतच्या झोपडण्यांना संरक्षण देणे तसेच झोपडपट्टी पूनर्वसन योजनेत झोपडीधारकास 400 चौरस फूटांचे घर देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शविली असल्याची माहिती महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिली. या मागण्यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने खासदार व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र अध्यक्ष भुपेश थुलकर, सरचिटणीस अविनाश महातेकर, उपमहापौर डॉ. धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, हनुमंत साठे, महेश शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. धेंडे म्हणाले, पुण्यासह राज्यातील झोपडपट्टी धारकांना 2011 पर्यंत संरक्षण देणे तसेच प्रत्येक झोपडपट्टी धारकाला 400 स्केअर फुटाचे क्षेत्र देण्याबरोबरच वाढीव चटई क्षेत्र देण्याची मागणी या बैठकीत शिष्टमंडळाकडून करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत याबाबत तातडीने निर्णय घेऊन राज्यपालांच्या स्वाक्षरीने या विषयी कायदा त्वरित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे राज्यातील झोपडपट्टी पूनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही डॉ. धेंडे यांनी माहिती देताना स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)