2007 मधील बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा 

हैदराबाद- 2007 मध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये हैदराबादेतील न्यायालयाने सोमवारी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर एकाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिनांक 25 ऑगस्ट 2007 रोजी हैदराबादमधील गोकुल चाट या प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रीच्या केंद्रामध्ये आणि खुल्या थिएटरमध्ये एकाचवेळी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये 44 जण ठार झाले होते, तर 68 जण जखमी झाले होते. या प्रकरणी 4 सप्टेंबर रोजी प्रभारी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी अनिक सफिक सय्यद आणि मोहंम्मद अकबर इस्माईल चौधरी या दोघांना दोषी ठरवले होते. मात्र फारुख सरफुद्दीन तरकश आणि मोहंम्मद सादिक इसरार अहमद शेक यांना पुरेशा पुराव्या अभावी निर्दोष मुक्‍त केले होते. नवी दिल्ली आणि अन्य ठिकाणच्या स्फोटांचा कट रचण्याच्या आरोपात तारिक अंजुम या पाचव्या आरोपीला न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते. त्याला आज आजन्म कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये अन्य तिघांच्या नावांचा उल्लेख होता. त्यामध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक रियाझ भटकळ, त्याचा भाऊ इक्‍बाल भटकळ आणि आमिर रेझा खान हे अद्याप फरारी आहेत. भटकळ बंधू हे मूळचे कर्नाटकातील रहिवासी असून सध्या त्यांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला असल्याचे समजते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)