2007 च्या हैदराबाद स्फोट प्रकरणात इंडियन मुजाहिदीनचे दोघे दोषी

हैदराबाद – सन 2007 साली झालेल्या येथील स्फोटाच्या प्रकरणात महानगर सत्र न्यायाधिशांनी इंडियन मुजाहिदीनच्या दोन जणांना आज दोषी ठरवले आहे. अनिक शफिक सईद आणि मोहंमद अकबर इस्माईल अशी दोषी ठरवण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या स्फोटात 44 जण ठार झाले आहेत. या प्रकरणातील फारूख शरीफुद्दीन तर्कश आणि मोहंमद सादीक इस्त्रार अहमद शेख या दोघांची मात्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपींना आश्रय दिल्याच्या कारणावरून तारीक अंजुमन यालाही दोषी ठरवण्यात आले असून त्याची शिक्षाही सोमवारीच जाहीर होणार आहे.
या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी तपास केला होता. यातील रियाज भटकळ, इक्‍बाल भटकळ आणि अमिर रेझा खान हे आरोपी फरारी आहेत.

25 ऑगस्ट 2007 रोजी हे स्फोट घडवण्यात आले होते. या प्रकरणी ऑक्‍टोबर 2016 मध्ये आरोपींच्या विरोधात खटला उभा राहिला. यात सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार लुंबिनी पार्क भागात अनिक सईद याने बॉंब ठेवला होता तर गोकुळ चाट भागात भटकळने बॉंब ठेवला होता. त्यात गोकुळ चाट भागातील स्फोटात 32 जण ठार आणि 47 जण जखमी झाले होते तर लुंबिनी पार्क भागात झालेल्या स्फोटात 12 जण ठार आणि 21 जण जखमी झाले होते.

दोन्ही स्फोट जवळपास एकाचवेळी झाले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून एकूण 170 साक्षीदार हजर करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)