गावठी मॅटर वेबसिरिजला दोन दिवसात तब्बल वीस हजार व्हीव

खेडेगावातील युवकांचा स्वयंरोजगाराचा यशस्वी प्रयत्न 
अमोल पवार 
उंब्रज – गावाला जायला रस्ता नाही…तिथे ना एस. टी. जाते ना पुरेशी मोबाइल रेंज…मात्र खेडेगावात काय आहे. म्हणणाऱ्यांसाठी गाव ऑनलाईन करून जाधववाडी, ता. पाटण येथील कलाकार युवकांनी गाववाडी प्रोडक्‍शनच्या माध्यमातून गावठी मॅटर नावाची वेबसिरिज सुरू करून अवघ्या दोन दिवसात तब्बल दोन हजारच्या वर सब्सक्राबर आणि वीस हजार व्हीव मिळवून यू ट्यूब च्या जगात धुमाकूळ घातला आहे.

आजच्या आधुनिक व तंत्रद्यानाच्या युगात पैसे कमवण्यासाठी अनेक तरुण नानाविध मार्ग चोखाळताना आपण नेहमीच पाहत आलोय. पैशाच्या हव्यासापोटी काहीजन गुन्हेगारीचा मार्ग अवलंबत आपल आख्खं आयुष्य देशोधडीला लावल्याची उदाहरणे आपण नेहमीच वर्तमान पत्रातून वाचत असतो. परंतु या सर्व गोष्टीपासून अलीप्त राहत काही तरुण-तरुणी खेडेगावात रोजगारची नवी संधी शोधली आहे आणि नोकरीसाठी शहरात धाव घेणाऱ्या युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. जाधववाडी (चाफळ), ता. पाटण येथील काही तरुणांनी सुरू केलेल्या गावठी मॅटरच्या माध्यमातून खेडेगावातील वाडी वस्तीतील लोकांच्या कलागुणांना वाव मिळाला असून नाट्यकर्मी आणि अंगभूत कलागुण असलेल्या कलाकारांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे.

-Ads-

चाफळच्या उत्तरेस दोन किलो मीटर अंतरावर जाधववाडी हे छोटस गांव आहे. सैनिकी परंपरा लाभलेले गांव म्हणून जाधववाडी गावची विभागात एक वेगळी ओळख आहे. देश सेवेसाठी येथील अनेक भूमीपुत्रांनी इंडियन आर्मीच्या माध्यमातून लाख मोलाचे योगदान दिले आहे. सरळ मार्गी व निर्व्यसनी तरुण वर्ग अशी विभागात गावची वेगळी ओळख निर्माण होत आहे. गावठी मॅटर मालिकेची निर्मिती जितेंद्र अरविंद पवार या तरुणाने केली असून परिसरात सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. स्वत: लेखक, दिग्दर्शक ते कलाकार बनलेल्या जितेंद्रने आपले मित्र अविनाश बाळासाहेब जाधव, पंकज सुनिल चव्हाण आणि इतर मित्र-मैत्रीणींना सोबत घेऊन जाधववाडी, गमेवाडी, उत्तरमांड धरण परीसरात या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे.विनोदी आणि प्रेम कथेच्या माध्यमातून आजकाल आपल्या समाजात मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत आहे आणि त्यावर मुलींनी किती काठोर आणि सक्षम राहीले पाहिजे. यावर सुंदर भाष्य या मलिकेतून करण्यात येणार असल्याचे टिम मार्फत सांगण्यात येत आहे. गावातील तरुणांनी समाज आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन एक मनोरंजक आणि कलाकार घडवण्यासाठी टाकलेले हे पाऊल निश्‍चीतच आजच्या तरुणांना आदर्शवत ठरणार असून यू ट्यूब वर असणाऱ्या अनेक वेब सिरिजसोबत खेडेगावातील युवक आपला वेगळा ठसा उमटविताना दिसत आहेत.

सातारा जिल्हा हा वेब सिरिजचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. जिल्ह्यातून अनेक खेडेगावातून वेब सिरिज सुरू असून तारळे, पाटण, सज्जनगड, कास, खटाव, कराड, ढेबेवाडी, नागठाणे तसेच अनेक भागातून वेब सिरिज सुरू आहेत. नोकरीसाठी शहरात गर्दी करण्यापेक्षा आजकाल वेबसिरीजच्या माध्यमातून समाजापुढे निरनिराळे विषय आणून त्याद्वारे पैसे कमावणे सोपे असल्याने शहरात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकासमोर आदर्श निर्माण होत आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)