2000 च्या बनावट नोटांचे पाकिस्तानी रॅकेट उघड – दोघांना अटक

नवी दिल्ली – 2000 च्या बनावट नोटांचे पकिस्तानी रॅकेट आज दिल्ली पोलीसांनी उघड केले आहे. पाकिस्तानहून बनावट नोटा आणून दिल्लीत सप्लाय करणाऱ्या प्रवीण आणि सोनू चौधरे या दोघांन दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. दोघेही बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून दोन हजाराच्या सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा पाकिस्तानमध्ये बनवण्यात आलेल्या आहेत. पोलीस या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.

बनावट नोटा घेऊन एक तस्कर दिल्लीतील रोहिणी सेक्‍टर 2 मध्ये येणार असल्याची गुप्त माहिती स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यांना मिळाली होती. त्यानंतर इन्स्पेक्‍टर विवेकानंद पाठक आणि जितेंद्र तिवारी यांनी सापळा रचून प्रवीणला अटक केली. नंतर त्याला नोटा पुरवणाऱ्या सोनू चौधरी यालाही बिहारमधील चंपारण येथे पकडण्यात आले. त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तान बनवण्यात आलेल्या नोटा बांगला देशमार्गे नेपाळहून पश्‍चिम बंगालमधील माल्डा येथे आणून नंतर संपूर्ण भारतभर त्यांचा पुरवठा होत होता. सोनूला गेली एपाच वर्षे माल्डातील अशरफकडून नोटांचा पुरवठा होत होता. त्याने 50 लाखापेक्षा जास्त किमतीच्या नोटांचा भारतभर पुरवठा केलेला आहे, प्रवीण गेली तीन वर्षे हे काम करत असून 20 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या बनावट नोटांचा पुरवठा त्याने केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)