ओतूर पोलिस ठाणे हद्दीत नार्को विभागाची धडक कारवाई
नगर, प्रतिनिधी: कल्याण महामार्गावर ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधे डुंबरवाडी (ता.जुन्नर) येथे बुधवारी(दि.१७) इनोव्हा क्रीस्टा कारमधुन अवैध वाहतुक केली जात असलेला सुमारे ३६ लाख रुपये किंमतीचा २०० किलो गांजा व २५ लाखाची इनोव्हा गाडी असा एकुन ६१ लाखाचा मुद्देमाल व दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. पुणे येथिल नार्को विभागाने ही कारवाई एका खबरीवरुन एक महिन्यापासून वॉच करुन केली असल्याचे कस्टम नार्कोटेक्स अधिकारी अलेक्झंडर ली यांनी दिली.
नार्कोटेक्स विभाग पुणेच्या वैशाली पतंगे, महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.