200 कोटींचे प्रस्ताव लटकले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समिती सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने, सलग दुसऱ्यांदा स्थायी समिती तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढावली आहे. सभेच्या विषय पत्रिकेवर सुमारे दोनशे कोटींहून अधिक रुपयांचे प्रस्ताव असताना देखील, दोन्ही आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानेच ही सभा वारंवार तहकूब करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे.

महापालिकेची 26 डिसेंबर 2018 रोजीची सभा गणसंख्येअभावी तहकूब केलेली आणि या आठवड्याची साप्ताहिक सभा मंगळवारी (दि. 1) पार पडली. ममता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ अभिनेते कादर खान आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही दोन्ही सभा शुक्रवारी (दि.4) दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन सभांच्या विषय पत्रिकेवर 200 कोटीहून अधिक रुपयांचे प्रस्ताव आहेत. त्यात आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्पाची उभारणी (84 कोटी), वायसीएमएच रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक कामे करणे (32 कोटी), चछहोली येथील चोविसवाडी – वडमुखवाडी 18 मीटर रस्ता विकसित करणे (19 कोटी 72 लाख रुपये), विशालनगर जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुलापर्यंतचा 24 मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे (14 कोटी 40 लाख 66 हजार रुपये), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वार चौका पर्यंतचा 18 मीटर रस्ता अर्बन डिझाईननुसार विकसित करणे (आठ कोटी 91 लाख रुपये) आदींचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)