चिनी शाळेवरील हल्ल्यात 20 विद्यार्थी जखमी-हल्लेखोर माजी कर्मचारी

बीजिंग (चीन): चीनमधील एका प्राथमिक शाळेवरील हल्ल्यात 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. ही शाळा बीजिंगच्या सायचेंग जिल्ह्यातील ही पहिल्या क्रमांकाची शाळा आहे. हल्लेखोर शाळेचा माजी कर्मचारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर सदर शाळेमध्ये द्वारपाल म्हणून काम करत होता. त्याचे काम समाधानकारक नसल्याने त्याच्या उमेदवारीचा काळ संपल्यानंतर त्याला कायम न करता कामावरून काढून टाकण्यात आले होते. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने हातोडीसारख्या एका हत्याराने शाळेच्या मैदानावर कवायत करणाऱ्या मुलांच्या मस्तकावर प्रहार केले. जखमी झालेल्या 20 मुलांपैकी 3 मुलांची अवस्था गंभीर असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

हल्लेखोराला अटक करण्यात आलेली आहे. दोन वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने केजीतील 12 विद्यांर्थ्यांवर सुरीने हल्ला केला होता. त्यातील चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. शाळेतील विद्यांर्थ्यांवर आणि मॉलमधील ग्राहकांवर हल्ले ही चीनमधील नित्याची गोष्ट झालेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)