आणखी 20 सीएनजी स्टेशन सुरू होणार

“एमएनजीएल’चा पुढाकार : 2 लाख वाहनांचा भार पेलवेना

पुणे – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनचालक सीएनजीकडे (कम्प्रेस्ड नॅचरल गॅस) वळत आहे. बसेस, रिक्षा, लहान चारचाकी वाहने अशी एकूण शहरात सुमारे दोन लाख वाहने सीएनजीवर धावत आहे. या वाहनांना 55 सीएनजी पंपांकडून गॅस पुरवठा होतो. सीएनजीवरील वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे स्टेशन यामुळे सीएनजी पंपावर अजूनही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी “एमएनजीएल’ने पुढाकार घेतला असून नव्याने आणखी 20 सीएनजी स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे नोंदणी झालेल्या 50 हजारांहून अधिक ऑटोरिक्षा, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) सुमारे 1235 बसेस सीएनजीवर धावत आहेत. प्रवासी वाहने, डाक सेवा वाहने, शाळेच्या बसेस, कुरिअर वाहने आणि इतर हलकी व्यावसायिक वाहनेसुध्दा सीएनजीचा वापर करत आहेत. सध्या “एमएनजीएल’कडून प्रति दिवशी 4.7 लाख स्टॅडर्ड क्‍युबिक मीटर सीएनजीची विक्री करण्यात येते. वाहन उत्पादकांकडून नवनव्या सीएनजी वाहनांचे उत्पादन तसेच पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे पेट्रोलवर चालणाऱ्या खासगी वाहनांचे रुपांतर सीएनजीमध्ये करण्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहरात सीएनजीवर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ असल्याचे दिसून येते. मात्र सीएनजीवरील वाहनांच्या संख्येच्या तुलनेत पंपांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे गॅस पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. यासर्व पार्श्‍वभूमीवर “एमएनजीएल’ने आणखी 20 स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनजी स्टेशनची संख्या अपुरी असल्याने वाहन चालकांना रांगेत थांबावे लागते. सीएनजी स्टेशनची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नवीन आणखी 20 स्टेशन सुरू करण्याचा विचार आहे. ही स्टेशन सुरू झाली, तर सीएनजी पंपाची संख्या 75 वर जाईल. यामुळे वाहनांना जास्त वेळ रांगेत थांबावे लागणार नाही. जागेअभावी स्टेशन सुरू करण्यास मर्यादा येत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडे 10 ठिकाणच्या जागेची मागणी केल्याची माहिती “एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)