अमेरिकेत लिमोझीनला झालेल्या अपघातात 20 ठार

श्‍चोहरी: अमेरिकेत न्युयॉर्क जवळ एका भव्य लिमोझीन गाडीला झालेल्या अपघातात वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या चार बहिणी आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण 18 जण ठार झाले तर लिमोझीन गाडीने धडक दिल्याने दोन पादचारी ठार झाले असे एकूण 20 जण एकाच अपघातात आज दगावले.

या गाडीतून एक कुटुंब एका तीस वर्षीय मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तिच्या अन्य बहीणी आणि अन्य नातेवाईकासह जात असताना अचानक स्टॉपचा सिग्नल लागला. त्यावेळी वेगात असलेली गाडी अचानक ब्रेक लाऊन थांबवण्याचा प्रयत्न झाला असता तरी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यावेळी तिच्यातील सर्व 18 ठार झालेच तर अन्य दोन पादचारीही ठार झाले. चारही बहिणी विवाहित होत्या आणि त्यांचे नवरेही त्यात होते. गाडीचा वेग ताशी 60 मैल इतका होता. ती रस्त्याच्याकडेला पार्क करून ठेवण्यात आलेल्या एका एसयुव्हीवर धडकली. त्यामुळे त्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे पण त्यात कोणीही नव्हते त्यामुळे तेथील प्राणहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)