सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)- पिसाळलेल्या कुत्र्याने मंगळवारी दुपारी 20 जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर, ल्हासुर्णे व कोरेगाव शहरातील एकूण 20 जणांना पिसाळलेले कुत्रे चावले. मृदुला मुकुंद पवार, प्रदीप सुर्यकांत पवार, विनोद संपत खताळ, हिंदुराव शंकर मतकर,पुजा आनंदा सणस, महेश माणिक जांभळे,शामराव कटारीया,संतोष शिंदे, गणेश गंगाराम शिंदे,किशोर विलास जाधव, जगन्नाथ शंकर कुंभार, प्रदीप बाळू माने,संकेत उबाळे अशी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्‍यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)