20 गावांसाठी वॉटर एटीएम देणार : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात वॉटर एटीएमसाठी आठ गावांची निवड केली असून आणखीन 20 गावांची वॉटर एटीएमसाठी निवड करा या 20 गावात वॉटर एटीएम पाणीपुरवठा विभागामार्फत उपलब्ध करुन दिले जातील, असे सांगून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, दुर्गेवाडी राष्ट्रीय पेयजल योजनेला विशेष मान्यता देऊन ही योजना मार्गी लावली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हातकणंगले तालुक्यात 25:15 योजनेमधून सुमारे 12 गावांसाठी 62 लाखाचा निधी पहिल्या टप्यात उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शासन आपल्या दारी हा उपक्रम महाराजस्व अभियानांतर्गत हाती घेऊन जनतेचे प्रश्न तसेच त्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध करुन द्यावीत, अशी सूचना करुन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, हातकणंगले तालुक्यातील सर्व गावांमध्ये तलाठी आणि ग्रामसेवकांनी गाव भेटीचा कार्यक्रम निश्चित करुन त्याद्वारे गावाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच संजय गांधी निराधारची प्रकरणे, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला असे विविध प्रकारचे प्रकरणे गावातच मार्गी लावावीत. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्यासाठी शाळांमध्येच विशेष मोहिम हाती घ्यावी.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)