20 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 255 कोटी

पिंपरी – “स्मार्ट सिटी’ अंतर्गत शहरातील 20.5 किलो मीटरच्या रस्त्यासाठी 255 कोटींचा निधी खर्च केला जाणार असून त्यासाठी लवकरच निविदाही काढण्यात येणार आहेत. एका किलो मीटरच्या रस्त्यासाठी तब्बल साडे अकरा कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे रस्ते अंतर्गत भागातील असणार आहेत. त्यामुळे हे रस्ते नेमके असणार तरी कसे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

“स्मार्ट सिटी’च्या संचालक मंडळाच्या शनिवारी (दि. 8) झालेल्या बैठकीत या खर्चाला मंजुरी देण्यात आली. तसेच 154 सीटस्‌च्या स्वच्छतागृहासाठी 11 कोटींचा खर्च देखील मंजूर करण्यात आला.

याबाबत विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, “स्मार्ट सिटी’ प्रकल्पात शहरातील अविकसित भागाची निवड करणे अपेक्षित होते. परंतु, मुळातच ज्या भागाचा विकास झालेला आहे. त्या भागाचाच पुन्हा “स्मार्ट सिटी’तून विकास करणे हे कितपत योग्य आहे?. केवळ पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसराला “स्मार्ट’ करुन पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा समतोल साधला जाणार नाही. त्यामुळे शहरातील अन्य भागाचाही या प्रकल्पातून विकास करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले की, “स्मार्ट सिटी’त संपुर्ण शहराचा विचार होणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शहराच्या अन्य भागात कामे करता येत नसल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. त्याला आमचा विरोध कायम राहणार आहे. याशिवाय शहरात सार्वजनिक ई-स्वच्छतागृह उभारली जाणार आहेत. परंतु, 11 कोटी रुपयात केवळ 154 सीट्‌सचे स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. म्हणजेच 72 लाखाचे 1 स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. तसेच निगडी ते दापोडी रस्त्यावरील मेट्रोच्या 61 खांबांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल साडे पाच कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कामांना शिवसेनेचा विरोध असणार आहे, असे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)