मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पूल कोसळला; तिघांचा मृत्यू तर 34 जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू, 40 वर्षीय रंजना तांबे आणि 32 वर्षीय जाहीद सिराज खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बचावकार्य सुरु असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक नगरसेवकांनी या पूलाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते, दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)