चंद्रपुरात मातीचा ढिगारा कोसळून 2 मजुरांचा मृत्यू

file photo

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात पाईपलाईनचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्य झाला, तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चिचाळा गावाशेजारी घडली.

हरिदास दुधबळे (42) आणि रवी उईके (31) असे मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. मूल तालुक्‍यातील चिचाळा येथे आसोलामेंढा कॅनलपासून पाणी आणण्यासाठी 10 ते 15 फूट खड्डा खोदून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु होते. हे काम पुण्यातील एका कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी खड्ड्यातील माती बाजूलाच काढून ठेवण्यात आली होती.
हा अपघात चुकीच्या पद्धतीने खड्डे खोदण्यात आल्यामुळे माती कोसळून झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर गजानन मेश्राम (40) हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर कंपनीने मृतांच्या कुटुंबियांना 15 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)