सत्तेत असताना २ ‘जी’ तर आता प्रियंका ‘जी’ : शहांचा काँग्रेसवर निशाणा

कांथी (पश्चिम बंगाल) : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. यावेळी बोलताना शहा यांनी प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशाबत सूचक वक्तव्य करताना म्हणाले की, “घराणेशाहीद्वारा चालवण्यात आलेले सरकार हे कधीच जनतेची सेवा करू शकत नाही. असे सरकार हे ‘मजबूत’ नाही तर ‘मजबूर’ सरकार असते.”

यावेळी बोलताना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर देखील चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, “देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा विजय संपादित करतील मात्र पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणूका या राज्यात लोकशाहीला पुन्हा जिवंत करण्याचे काम करतील. कारण यावेळी पश्चिम बंगालची जनता ममतांना त्यांची जागा दाखवून देईल.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रियंका यांच्याबाबत अमित शहा म्हणाले की, “काँग्रेस सत्तेत असताना आपण २ ‘जी’ घोटाळा अनुभवाला आहे आता या ‘जी’ मध्ये प्रियंका ‘जी’ यांची भर पडली असल्याने किती घोटाळे होतील याची कल्पनाच न केलेली बरी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)