इचलकरंजीत दोन पिस्तूल जप्त; सांगलीच्या दोघांना अटक 

कोल्हापूर/प्रतिनिधी – इचलकरंजी  येथील शहापूर पोलिसांनी नाकाबंदीवेळी दोन संशयितांना पकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल व १२ जिवंत काडतूसे जप्त केली. त्याची किमत दीड लाख रुपये इतकी आहे. विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील वय २३ रा. डफळापूर, ता. जत व सतिश शिवाजी कोळी वय २७ रा. घाटनांद्रे, कवठेमहांकाळ अशी अटक केलेल्यांती नावे अाहेत.

दोन्ही संशयीत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पिस्तूल विक्रीचे सांगली शहर व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे नोंद आहेत. या शिवाय दरोडा, दरोड्याचे प्रयत्न या सारखे गुन्हे नोंद आहेत. काल रात्री ८ वाजता यड्राव फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक मोटर सायकल ही जप्त करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)