शिरूरमध्ये 21 लाख; तर मावळमध्ये 22 लाख मतदार

सोमवारी मतदान : मतदारांच्या दोन पुरवणी याद्या तयार

पुणे – शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मतदार संघांतील मतदारांच्या दोन पुरवणी याद्या तयार करण्यात आल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात 21 लाख 73 हजार तर मावळ मतदारसंघात 22 लाख 97 हजार मतदार आहेत. दरम्यान, शिरूर व मावळसाठी येत्या सोमवारी (दि.29) मतदान होणार आहे.

यंदा प्रथमच जिल्ह्यात दोन टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुका दि.23 एप्रिल रोजी पार पडल्या. आता फक्त मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणे बाकी आहे. या निवडणुकीसाठीची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पूर्णपणे पुणे शहराच्या हद्दीत समाविष्ट होतो. तर भोसरी हा मतदारसंघ पिंपरी-चिंचवड शहरात आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी असा दोन्ही भाग शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार हडपसरमध्ये असून या ठिकाणी 4 लाख 87 हजार 699 मतदार तर भोसरीमध्ये 4 लाख 13 हजार 680 मतदार आहेत.

तर मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ, चिंचवड आणि पिंपरी या पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तसेच, रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन मतदारसंघांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)