“2.0’मध्ये अक्षय कुमार बनला सुपर व्हिलन 

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या आगामी “2.0’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. अक्षय कुमारचा हा पहिला सायन्स फिक्‍शन चित्रपट असून यात त्याने सुपर व्हिलनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अक्षयने असे काम केले आहे, जे त्याने अन्य चित्रपटात केलेले नाही.

“2.0’मधील भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी अक्षयने आपला पूर्ण लूकच बदला आहे. याबाबत माहिती देताना अक्षयने ट्‌वीट केले की, “2.0’ची कथानक सामान्य चित्रपटापेक्षा वेगळे आहे. या चित्रपटातील माझा लूक तयार करण्यासाठी मुख्य हिरोपेक्षा अधिक वेळ लागला. मला मेकअप करण्यासाठी 3 तासांचा वेळ लागायचा, तर तो काढण्यासाठी 1 तास जायचा. जेव्हा मी स्वतःला स्क्रीनवर पाहिले तेव्हा मी अचंबीतच झालो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन साउथमधील प्रसिद्ध डायरेक्‍टर शंकर यांनी केले आहे. व्हिलनच्या भूमिकेसाठी अक्षयच्या अगोदर अनेक स्टार कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. यात कमल हसन, आमिर खान, नील नितिी मुकेश, ह्रतिक रोशन आणि हॉलिवूड ऍक्‍शन स्टार अर्नोल्ड श्वार्ज़नेगर आदींचा समावेश आहे. दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ह्रतिक रोशन आणि आलिया भट्टने चित्रपटाची स्तुती केली आहे. “2.0’चा ट्रेलर शेअर करत आलिया म्हणाली, या भव्य चित्रपटात 3 लीजेंड एकत्रित आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)