2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची केली कमाई

रजनीकांत आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेल्या 2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची कमाई केली आहे. उत्तर भारत आणि इतर हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.  तसेच  या चित्रपटाने सर्वप्रथम भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचा बहुमान मिळविला. ऍडव्हान्स बुकिंगमधूनच  तब्बल 120 कोटींची कमाई करत चित्रपटाने वीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. आता चित्रपटाच्या कमाईबाबतही तो विक्रमी कामगीरी करत आहे.
“2.0’ने प्रदर्शनापूर्वीच 490 कोटी रुपयांची कमाई केल्याने चित्रपट निर्मात्याचा अर्ध्याहून अधिक खर्च वसूल झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 540 ते 550 कोटींचा खर्च आला आहे. यातील राईट्‌स आणि ऍडव्हान्स बुकिंगमधून 490 कोटींची कमाई झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी “2.0’चे सॅटलाईट राइट्‌स सुमारे 120 कोटींना, तर डिजिटल राइट्‌स सुमारे 60 कोटींना दिले आहेत. तसेच ऍडव्हास राईट्‌ससाठी 190 कोटी आणि ऍडव्हान्स तिकिट बुकिंगमधून 120 कोटी रुपये मिळविले आहेत.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाच्या, तर रजनीकांत हा “रोबॉट’ चित्रपटातील चिट्टीचा अपग्रेड व्हर्जनची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात येणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)