‘2.0’ चित्रपटाने कमवले ‘इतके’ कोटी

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट असलेला “2.0′ चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची त्याला चांगली पसंती मिळात आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 85 कोटींची कमाई केली आहे तर जगभरातून 30 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपट 115 कोटींची कमाई झाली आहे. 2.0 ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम राहिल्यास चित्रपटाच्या नावाने अनेक विक्रम प्रस्थापित होतील.

-Ads-

या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाच्या, तर रजनीकांत हा “रोबॉट’ चित्रपटातील चिट्टीचा अपग्रेड व्हर्जनची भूमिका साकारत आहे. 2.0 हा तामिळ, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी भाषेत जगभरात प्रसिद्ध झाला. जवळपास 7 हजारांहून अधिक स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच 2.0 चित्रपटाने अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावे केली आहे. या चित्रपटाने सर्वप्रथम भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर अॅडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 120 कोटींची कमाई करत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)