“2.0’ची प्रदर्शनापूर्वीच 490 कोटींची कमाई 

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट असलेल्या “2.0′ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावे केली आहे. या चित्रपटाने सर्वप्रथम भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर ऍडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 120 कोटींची कमाई करत नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. आता चित्रपटाच्या कमाईबाबतही तो विक्रमी कामगीरी करत आहे.

“2.0’ने प्रदर्शनापूर्वीच 490 कोटी रुपयांची कमाई केल्याने चित्रपट निर्मात्याचा अर्ध्याहून अधिक खर्च वसूल झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 540 ते 550 कोटींचा खर्च आला आहे. यातील राईट्‌स आणि ऍडव्हान्स बुकिंगमधून 490 कोटींची कमाई झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी “2.0’चे सॅटलाईट राइट्‌स सुमारे 120 कोटींना, तर डिजिटल राइट्‌स सुमारे 60 कोटींना दिले आहेत. तसेच ऍडव्हास राईट्‌ससाठी 190 कोटी आणि ऍडव्हान्स तिकिट बुकिंगमधून 120 कोटी रुपये मिळविले आहेत.

-Ads-

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाच्या, तर रजनीकांत हा “रोबॉट’ चित्रपटातील चिट्टीचा अपग्रेड व्हर्जनची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
59 :thumbsup: Thumbs up
54 :heart: Love
4 :joy: Joy
24 :heart_eyes: Awesome
16 :blush: Great
13 :cry: Sad
24 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)