‘2.0’चा ट्रेलर रिलीज – पहा व्हिडिओ

सुपरस्टार रजनीकांत यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘२.०’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून रजनीकांत हे पुन्हा चिट्टी रोबोटच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर खलनायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. चित्रपटाच्या २ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये खलनायक अक्षय कुमार शहरातील सर्व मोबाईल फोन आपल्या शक्तीने खेचून घेतो. त्यानंतर एका पक्षाचे रूप घेऊन सर्व शहरात दहशत निर्माण करतो.

या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रजनीकांत प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. या चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. त्याचबरोबर एमी जॅकसनला देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)