2 युद्धनौकांसाठी रशियाबरोबर 500 दशलक्ष डॉलरचा करार 

नवी दिल्ली – नौदलासाठी दोन युद्धनौका बांधणीसाठी रशियाबरोबर 500 दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला आहे. या दोन्ही युद्धनौका गोव्यामध्ये बांधण्यात येणार आहेत. तलवार श्रेणीतील या युद्धनौकांसाठीचा करार गोव्यातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गोवा शीपयार्ड (जीएसएल) आणि रशियातील संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी रोसोबोरोनेक्‍सपोर्ट यांच्यामध्ये करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या सरकारांदरम्यानच्या संरक्षण सहकार्यासाठीच्या चौकटीअंतर्गत हा करार करण्यात आला आहे.

या करारांतर्गत रशियाकडून या युद्धनौकांच्या बांधणीसाठी आवश्‍यक असलेले आरेखन, तंत्रज्ञान आणि महत्वाची सामुग्री “जीएसएल’ला पुरवले जाणार आहे. या दोन्ही युद्धनौकांवर अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रास्त्रांची यंत्रणा असणार आहे, असे “जीएसएल’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शेखर मितल यांनी सांगितले. या युद्धनौकांची बांधणी 2020 मध्ये सुरू होईल. त्यापैकी पहिली युद्धनौका 2026 मध्ये तयार होईल तर दुसरी 2027 साली पूर्ण होईल.

भारत आणि रशिया दरम्यान यापूर्वीच 1 अब्ज डॉलरचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार रशिया 2023 पर्यंत दोन लढाऊ नौका भारताला देणार आहे. रशियाबरोबर संरक्षण सहकार्य केल्यास अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याच्या इशाऱ्यानंतरही हा करार झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)