2 एप्रिलपासून देशभरातील डॉक्टर जाणार बेमुदत संपावर

नवी दिल्ली: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी देशातील डॉक्टर मोदी सरकारविरोधात देशव्यापी संप पुकारणार आहेत.  डॉक्टरांनी पुकारलेला संप हा बेमुदत संप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 मार्च रोजी दिल्लीत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायतीचे आयोजन केले होते. या बैठकीत संप पुकारण्यासंदर्भात सर्व डॉक्टरांचे एकमत झाले आहे.

या महापंचायतीला देशभरातील 25 हजार डॉक्टर, जुनिअर डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही उपस्थित होते. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक गरिबांच्या विरोधात आहे. या विधेयकातील काही मुद्द्यांमुळे वैद्यकीय व्यवसायात भ्रष्टाचार वाढेल, असेही  डॉ. वानखेडकर म्हणाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील वैद्यकीय व्यवसायाचे नुकसान झाले आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील काही मुद्दे डॉक्टरांच्या विरोधात आहेत.

संसदीय समितीने दिलेला रिपोर्ट मान्य करायचा का नाही याचा अधिकार सरकारकडे आहे. त्यामुळे 2 एप्रिलपासून सर्व डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी बेमुदत संपावर जाणार आहेत. 27 मार्चला हे विधेयक पुन्हा संसदेत चर्चेसाठी सादर केलं जाईल. यानंतर आम्ही पुढचं पाऊल ठरवू असे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)