2 आक्‍टोबरला मार्केट यार्डात स्वच्छता अभियान

पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बाजार समिती आणि दि पूना मर्चंटस्‌ चेंबरच्या वतीने मार्केट यार्डात “स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 9 वाजता बाजार आवारातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळा येथे अभिवादन करून या अभियानास सुरूवात होणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चालू केलेल्या स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तसेच उपबाजारांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यादिवशी बाजारातील आडते, शेतकरी, तोलणार, मापाडी, व्यापारी तसेच बाजार समितीचे कर्मचारी एकत्रितरित्या आवारात साफसफाई करणार आहेत. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)