स्वंतत्र भारताच्या पहिल्या मतदाराने वयाच्या ‘103 व्या’ वर्षी बजावला मतदानाचा हक्क

हिमाचल प्रदेश – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान होत आहे. आज मतदानाचा हक्क बजावण्याचा उत्साह 103 वर्षीय शाम शरण नेगी यांच्यासह नवतरूणांमध्ये दिसून आला आहे.

स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार असलेले शाम शरण नेगी यांनी आपल्या आयुष्यातील 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान केलं आहे. हिमाचल प्रदेशातील कल्पा येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावत देशातील मतदारांपुढे आदर्श ठेवला आहे.

हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे राहणारे नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. डोळ्यांनी कमी दिसत असले तरी आणि गुडघादुखी असून सुध्दा त्यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केले. देशात आतापर्यंत झालेल्या सर्वच्यासर्व 17 लोकसभा निवडणुकीत नेगी यांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. वयाची शंभरीपार केलेले नेगी गेली 68 वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत, ही अतिशय कौतुकाची बाब आहे.

दरम्यान, 2014 च्या निवडणुकांदरम्यान गुगलने नेगी यांचा एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत नेगी यांनी आपल्या पहिल्या वोटिंगची कहाणी सांगितली आहे. या व्हिडिओनंतर नेगी यांना प्रसिद्धी मिळाली.

किन्नोर येथे पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा निवडणुका व्हायच्या होत्या, तेव्हा हिमाचल प्रदेशात हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी लक्षात घेऊन तिथे निवडणुका आधी घेण्यात आल्या. अन्य राज्यांत 1952 च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निवडणुका झाल्या. हिमाचल प्रदेशातल्या मंडी क्षेत्रात 25 ऑक्टोबर 1975 रोजी झालेल्या निवडणुकीत नेगी हे मतदानाचा हक्क बजावणारे पहिले भारतीय ठरले. त्यावेळी नेगी शिक्षक होते. ते 1975 मध्ये निवृत्त झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)