१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा मृत्यू

नागपूर – १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा बुधवारी नागपूरच्या हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. अब्दुल गनी तुर्क नागपूरच्या सेंट्रल जेल मध्ये शिक्षा भोगत होता. त्याच्या तब्येतीमध्ये बिघाड झाल्याने त्याला नागपूर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अब्दुल गनी तुर्क याला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यात बदल करत त्याला जन्म ठेपेची शिक्षा सुनावली होती. टॅक्सी ड्रायवर असणाऱ्या अब्दुल गनी तुर्क याला सेंचुरी बाजार येथील बस बॉम्बस्फोटासंदर्भात दोषी आढळल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. या बॉम्बस्फोटामध्ये ११३ जणांचा मृत्यू झाला होता, तर २५० हुन अधिक लोक जखमी झाले होते.

https://twitter.com/ANI/status/1121369772451614720

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)