नगरमध्ये संघर्षाच्या स्थितीत 1991 ची पुनरावृत्ती होईल- शरद पवार

नगर: “लोकसभा निवडणुकीत विरोधक सर्व शक्तीचा वापर करतील, मात्र आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू. ही लढाई धनशक्तीविरोधात सर्वसामान्यांची असेल. संघर्षाची स्थिती आहे. नगरमध्ये 1991 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. नगर येथील कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

पवार म्हणाले, “देशाचे व राज्याचे लक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. पूर्वी एकदा अशीच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी यशवंतराव गडाख यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देत निवडून आणले. यावेळी तिकिटाची मागणी केली. काहींनी बाहेरचा माणूस घ्यावा, अशा मागण्या केल्या. पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगले उमेदवार आहेत.’

राष्ट्रवादीने जाणिवपूर्वक कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा, आदर जपण्यासाठी ही जागा आपल्या हाती ठेवली आहे. नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. त्यांनी दोन्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली. आता त्यांनी तिसरा पर्याय निवडला आहे. आपली लढाई भाजप-सेनेविरोधात आहे. शिवसेना भाजपला किती साथ देते हे आपल्याला माहित आहेच. विरोधातील उमेदवार अदृश्‍य शक्तीचांही वापर करू शकतात. त्याविरोधात आपल्याला एकसंघपणे लढाई द्यायची आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)