1984 च्या शिख विरोधी दंगल प्रकरणी एकाला फाशीची शिक्षा 

अन्य एका दोषीला आजन्म कारावास 

“एसआयटी’च्या फेरतपासातील पहिलीच शिक्षा 

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये 1984 साली झालेल्या शिख विरोधी दंगलीमध्ये दोन जणांची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या यशपाल सिंग याला दिल्ली न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सहआरोपी नरेश शेरावत याला अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दिल्ली न्यायालयाच्या आवारात दोषींवर झालेला प्राणघातक हल्ला आणि सुरक्षा कारणास्तव या प्रकरणी शिक्षेची सुनावणी तिहार कारागृहातच करण्यात आली.

-Ads-

दिल्ली न्यायालयाने 14 नोव्हेंबर रोजी यशपाल सिंग आणि शेरावत यांना दोषी ठरवले होते. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीमध्ये सुरजीत सिंग, संगत सिंग आणि कुलदीप सिंग या तिघांची हत्या केल्याचा आरोप या दोघांवर होता.

2015 साली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने 1984 च्या दंगलीची फेर चौकशी करण्यात आल्यानंतर दोषी ठरवण्यात आलेले हे पहिलेच आरोपी आहेत. “एसआयटी’ने एकूण 60 प्रकरणांचा फेरतपास करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी 52 प्रकरणांचा तपास दिल्ली पोलिसांनी 1994 साली पुराव्या अभावी बंद केला होता. मात्र “एसआयटी’च्या माध्यमातून या प्रकरणाची फेरचौकशी करून आरोपींना दोषी ठरवले आहे.

“एसआयटी’ने 18 जणांच्या जबाबाची फेरतपासणी करून या दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. शिख विरोधी दंगलीतील अन्य 3 प्रकरणांचा तपास प्रलंबित आहे. यामध्ये कॉंग्रेस नेते सज्जन सिंग यांच्या विरोधातील प्रकरणाचाही समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)