नवी दिल्ली – नवी दिल्लीपासून श्रीनगरला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या 1981 मधील अपहरण प्रकरणातील दोघांना दिल्लीतल्या न्यायालयाने निर्दोष मुक्‍त केले.

ताजिंदर पाल सिंग आणि सतनाम सिंग अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी 29 सप्टेंबर 1981 रोजी इंडियन एअरलाईन्सचे नवी दिल्लीवरून अमृतसरमार्गे श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अपहरण केले होते. हे विमान पुढे पाकिस्तानात लाहोरला नेण्यात आले होते. तेथे या दोघा अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगल्यानंतर या दोघांना 2000 साली भारतात आणण्यात आले होते.

2011 साली दिल्ली पोलिसांनी या दोघांवर देशद्रोह, गुन्हेगारी कट करणे आदी विविध कलमांखाली आरोप ठेवले. सत्र न्यायालयाची सुनावणी थांबवण्याची या दोघांनी केलेली मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या दोघांनाही गेल्यावर्षी जुलैमध्ये जामीनही मंजूर झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)