196 जणांवर कारवाईचा बडगा

पिंपरी – सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने जोरदार कारवाई सुरु केली आहे. गेल्या तीन दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 78, कचरा टाकणाऱ्या 88, उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 28 आणि उघड्यावर शौच करणाऱ्या दोन अशा 196 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एकूण 41 हजार 820 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

सरकारने घनकचरा व्यवस्थापन नियम आणि 2016 च्या तरतुदीचे पालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थाना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान केले आहेत. त्यानुसार पिंपरी महापालिकेकडून रस्त्यावर थुंकल्यास, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पुणे महापालिकेने कारवाई केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही अशा प्रकारच्या कारवाईची मागणी शहरातील सामाजिक संघटनांकडून होत होती. अखेर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला.

-Ads-

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे 180 रुपये, रस्त्यांवर थुंकल्यास 150 रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 200 रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. रस्त्यांवर थुंकलेल्या अ प्रभागातील 32, ब एक, क मधील सात, ड प्रभागातील 14, इ मधील 14, फ चार, ग दोन आणि ह चार अशा 78 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 11 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या अ प्रभागातील 66, ब प्रभागातील एक, क चार, ड तीन, फ दोन, ग पाच आणि ह प्रभागातील सात अशा 88 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 24 हजार 20 रुपये दंड वसूल केला आहे.

उघड्यावर लघुशंका करणाऱ्या अ प्रभागातील दोन, ब प्रभागातील आठ, क पाच, ड सहा, इ एक, फ चार आणि ह प्रभागातील दोन अशा 28 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर, उघड्यावर शौच करणाऱ्या ड प्रभागातील दोघांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)