बांगलादेशात 22 मजली इमारतीच्या आगीत 19 ठार 

संग्रहित छायाचित्र.......

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एका टोलेजंग इमारतीला लागलेल्या आगीमध्ये किमान 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये श्रीलंकेच्या एका नागरिकाचाही समावेश आहे. या आगीमध्ये तब्बल 70 जण जखमी झाले आहेत. राजधानी ढाकामध्ये गेल्याच महिन्यात रसायनांच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिन्याभरातच झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

ढाक्‍यामधील बनानी भागातल्या 22 मजली इमारतीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर पहिल्यांदा ही आग लागली आणि हळूहळू 9,10 आणि 11व्या मजल्यावर पसरली. मात्र आग नक्की कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. या इमारतीमध्ये कपड्यांची अनेक दुकाने आणि इंटरनेट सेवा केंद्रे आहेत. इमारतीच्या आजूबाजूच्या दोन इमारतींमध्ये आग झपाट्याने पसरल्याने अनेक नागरिक या इमारतीमध्ये अडकून पडले होते. संध्याकाळपर्यंत 19 जण मरण पावल्याचे स्पष्ट झाले होते.

आग झपाट्याने वरच्या मजल्यावर सरकायला लागल्याने वरच्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांनी उडी मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये किमान 6 जण मरण पावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीमध्ये जखमी झालेल्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी आगीचे 21 बंब, बांगलादेशाच्या हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि नौदलाचे कमांडो यांच्या एकत्रित प्रयत्नांना संध्याकाळी उशीरा यश आले. लष्कर आणि हवाई दलाच्या 5 हेलिकॉप्टरनीही आग विझवण्यासाठी उंचावरून पाण्याचा मारा केला. आगीमुळे इमारतीच्या आग मोठा धूर कोंडून राहिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)