19 वर्षाखालील खो खो संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नारायणगाव- क्रीडा आणि युवक सेवा संचनालय (पुणे) अंतर्गत, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित विभागीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा. प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या संघाची धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी दिली.
विजयी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे- वृषभ वाघ (कर्णधार), संदेश जाधव, वैभव भोर, गौरव मुळे, श्रेयस खरमाळे, कुणाल वाघ, अजय वाघ, प्रज्वल जाधव, हर्षल वाघ, साहिल वाघ, ऋत्विक भोर, राहुल वाघ. या यशस्वी खेळाडूंना एस. एस. गाळव, बी. बी. पालवे, बी. जी. गुळवे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)