1,862 बेशिस्तांचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त

वाहतूक पोलिसांची कारवाई : 279 पासपोर्ट रोखले

पुणे – वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या चालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेने काही महिन्यांपासून कंबर कसली आहे. त्यात आतापर्यंत 1,862 बेशिस्त वाहन चालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्तांना लगाम बसण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यांवरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यानुसार 1 जानेवारी ते 31 ऑगस्टपर्यंत वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने जप्त करण्यास सुरूवात केली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 1503 जणांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामध्ये मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पोलिसांनी 1,862 जणांचे परवाने रद्द केले. त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाहनचालकांची संख्या 1,503 इतकी आहे. त्यामध्ये मद्यपान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांची 338 आहे. तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 35 परवाने विचाराधीन असल्याची वाहतूक शाखेचे नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 279 जणांचे पासपोर्ट रोखल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)