जुन्नर तालुक्‍यात डीजेचा दणदणाट

  • पोलिसांकडून पाठराखण ःउच्च न्यायालयाच्या आदेशाचे होतेय उल्लंघन
    पोलीस अधीक्षक प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?
    नांगरे पाटील व हक करतात समाजजागृती, तर अधिकारी-कर्मचारी करतात कायद्याचे उल्लंघन
    नारायणगाव – उच्च न्यायालयाच्या डीजे बंदीचा आदेश डावलून जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात गणपती विसर्जनाला पोलिसांच्या उपस्थितीत डीजे वाजवून गणपती विसर्जन करण्यात आल्याने पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीजे बंदी संदर्भात चालविलेली कठोर अंमलबजावणीला पोलिसांकडूनच खो घालण्यात येत आहे.
    जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंद्रे या गावात गणपतीच्या पाचव्या दिवसांच्या विसर्जनासाठी अनेक मंडळांनी दुपारी 5 वाजता, रात्री 8 ते 10 मोठे साउंड बॉक्‍स असलेले सुमारे 4 ते 5 डीजे लावून रात्री 11च्या सुमारास गणपती विसर्जन केले. विशेष म्हणजे या विसर्जन मिरवणुकीला पोलीस बंदोबस्त होता. दोन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांनीही मूकसंमती देऊन डीजे वाजवून दिला. कायद्याचे रक्षक असणारे पोलीसच जर कायदा मोडण्याऱ्यांना सहकार्य करीत असतील तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे व डॉल्बी या वाद्यांच्या बंदीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जनजागृती केली आहे. जुन्नर येथील मागील आठवड्यात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक हक यांनी तसे आदेश पोलीस अधिकारी व सर्व नागरिकांना आवाहन केले होते. जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अधीक्षकाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता कायद्याचे उल्लंघन केले आहे. मात्र जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याकडून उल्लंघन होत आहे. या आदेशाचे उल्लंघन ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होईल त्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या संदर्भात जुन्नर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या ही बाब गंभीर असून जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांना चौकशी करून डीजे चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन कोण पोलीस उपस्थित होते. त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)