राज्यातील 18 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रविण दराडे

मुंबई  – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यानुसार आज पुन्हा एकदा 18 सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले व एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर दराडे यांच्या जागी सोनिया सेठी यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ए. बी. सुभेदार यांना मंत्रालयात नगरविकास विभागाचे सहसचिव म्हणून पाठविण्यात आले आहे. वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी बी. जी. पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच साताऱ्याचे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व्ही. बी. पवार यांना मंत्रालयात कौशल्य विकास मंत्रालयाच्या सहसचिवपदी, तर नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. एम. एस. कलशेठी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पुणे येथील दिव्यांग विकास आयुक्त बालाजी मंजुळे यांना नंदुरबारचे जिल्हाधिकारी पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)