सराईत गुन्हेगार महिलेने केला साथीदाराचा खून

सराईत गुन्हेगार महिलेने केला साथीदाराचा खून
घरफोडीचा तपास करताना तीन वर्षापूर्वी केलेला गुन्हा उघडकीस
मृतदेहाची कवटी सापडली कात्रज घाटात
पुणे,दि.27(प्रतिनिधी)- सराईत गुन्हेगार महिलेने साथीदाराचा खून केल्याची घटना तब्बल तीन वर्षानंतर उघडकीस आली आहे. घरफोडीचा तपास करताना इतर साथीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आला आहे. दरम्यान पोलिसांना खून झालेल्या व्यक्तीची कवटी कात्रज घाटात सापडली आहे.
रिटा उर्फ मॅग्डलीन डेंन्सील डिसोझा( 48,रा.सिध्देश्‍वर पेठ, सोलापूर , सध्या- उंड्री), अजय डॅनियल गिल(23,मुळ जालंदर, सध्या कोंढवा), सॅमसम उर्फ बॉबी ऍन्थोनी ब्रुक्‍स(26, मुळ सातारा, सध्या आकुर्डी), पांडुरंग विठ्ठल जगताप(34, मुळा बारामती, सध्या निगडी) आणी सर्फराज ईस्माईल शेख (29, मुळ उत्तरप्रदेश, सध्या उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या टोळीने त्यांचा साथीदार हरप्रितसिंग जग्गासिंग निज्जर याचा खून केला आहे.
शहरात मागील काही दिवसांत रात्री व दिवसा घरफोडीच्या गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे व पोलीस उपायुक्त(गुन्हे) पंकज डहाणे यांनी घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून ते क्रियाशिल असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानूसार रिटा आणी तीच्या टोळीला गुन्हेशाखेने चौकशीसाठी बोलावले होते. या टोळीला गुन्हे शाखेने 2014 मध्ये अटक केली होती. तेव्हा त्यांच्याकडून वाहनचोरी आणी घरफोडीचे 23 गुन्हे उघडकीस आले होते. ही टोळी सध्या जामिनावर सुटलेली आहे. या टोळीतील त्यांचा साथीदार हरप्रितसिंग जग्गासिंग निज्जर हा 2014 पासून फरार होतो. त्याला अद्याप एकदाही अटक झाली नव्हती. यामुळे निज्जर संदर्भात पोलीस या टोळीकडून माहिती काढत असताना अजय गिल हा घाबरुन जाऊन उत्तरे देत होता. यामुळे त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने रिटाच्या सांगण्याप्रमाणे निज्जरचा खून करुन त्याची बॉडी कात्रज घाटात टाकल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरुन इतर आरोपींना वेगवेगळे करुन त्यांच्याकडे निज्जर संदर्भात चौकशी करण्यात आली. त्यांनीही या गुन्हयाची कबुली दिली. त्यानूसार गिल याने कात्रज घाटात दाखवलेल्या जागेवर दोन पंच, वनकर्मचारी आणी गिर्यारोहक यांच्या समक्ष शोध घेण्यात आला. तेव्हा घाटामध्ये एका पुरुषाची कवटी आढळली. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याकाळात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मयत किंवा खूनाचा कोणताच गुन्हा दाखल नसल्याची खात्री झाली. यामुळे सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
…म्हणून काढला रिटाने निज्जरचा काटा
पतीबरोबर भांडण झाल्याने निज्जरची आई त्याला घेऊन पंजाब येथून महाराष्ट्रात 2000 साली पळून आली होती. इथे ती बहिणीकडे रहात होती. दरम्यान तीची रिटाबरोबर ओळख झाल्याने रिटाने तीला स्वत:च्या घरी कामास ठेवले तर निज्जर याला एसटीडी बुथ संभाळण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात निज्जरची आई वेश्‍याव्यवसाय तर निज्जर वाहनचोरी आणी घरफोडी करण्यास लागला. निज्जरच्या आईला एका व्यापाऱ्याने टिंगणेनरग येथे रखेल म्हणून ठेवले. यामुळे निज्जर रिटाबरोबर राहू लागला. निज्जरची आई 2016 साली कर्करोगाने मरण पावली. रिटाचा पती डेझील डिझुसा हा मस्कत येथे नोकरीनिमीत्त रहावयास होता. त्यांना दोन मुली व दोन मुले असा परिवार होता. पती सतत परदेशात असल्याने रिटा 38 वर्षाची असताना 2007 साली निज्जरबरोबर शारीरीक संबंध ठेऊ लागली. रिटाने पतीस तसे कळवून ती स्वत: निज्जरची रखेल म्हणून राहू लागली. निज्जर चोऱ्या केलेला ऐवज व रक्कम तीच्याकडे ठेवत होता. रिटाच्या मुली काहीवर्षाने निज्जरच्या वयाशी मिळत्या-जुळत्या झाल्याने निज्जर त्यांच्यावर जबरदस्ती व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करु लागला. रिटाने याला विरोध केल्यास तो तीला मारहाण करत असे. थोरल्या मुलीचा खून करण्याची तसेच छोट्या मुलीला पळवून नेण्याची तो धमकी देत असे. रिटा निज्जरच्या अत्याचाराला कंटाळलेली होती, यामुळे तीने निज्जरचा कायमचा काटा काढण्याचा कट रचना. यासाठी तीने प्रथम निज्जरचा गाववाला साथीदार अजय गिल याला कारागृहात पत्र पाठवून निज्जर तुझ्या गावी नातेवाईकांना तु मोठा चोर झाल्याचे सांगत बदनामी करत असल्याचे सांगितले. त्याच्या मनात निज्जरबद्दल व्देष निर्माण केला. यानंतर गिल जामिनावर बाहेर आल्यावर निज्जरचा खून करण्याचा कट रचण्यात आला. यासाठी रिटाने अजय गिलला 20 हजार, सर्फराज शेखला 50 हजार व सुमित मुदलियार यास 20 हजार सुपारी देण्याचे ठरवले. कटाप्रमाणे ती औंध येथील खोली सोडून उंड्री येथे एकांतात नवीन बांधकाम झालेल्या इमारतीत घर भाड्याने घेऊन राहू लागली. तीच्यासोबत निज्जरपासून झालेला सहा वर्षाचा मुलना सनीही रहात होता. यानंतर तीने 27 एप्रिल 2014 रोजी मयत आईचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी निज्जरला बोलावले. यासाठी आयोजीत पार्टीत भाऊ नेल्सन गायकवाड यालाही बोलावले होते. तेथे निज्जरला भरपूर दारु पाजल्याने तो गाढ झोपी गेला होता. तो झोपेत असतानाच बेडरुममध्ये सर्वांनी कटावणी आणी धारदार हत्याराने त्याचा खून केला. यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास रिटाच्या फोर्ड आयकॉन गाडीने निज्जरचा मृतदेह कात्रज घाटातील दरीत फेकून देण्यात आला.
यागुन्हयात अटक करण्यात आलेल्या रिटा उर्फ मॅग्डलीन डेंझील डिसुझावर वाहन चोरी व घरफोडीचे 16 गुन्हे, अजय गिलवर वाहन चोरी व घरफोडीचे 18 गुन्हे आणी सुमित मुदलियारवर घरफोडीचा एक गुन्हा दाखल आहे.
हा गुन्हा युनिट पाचचे प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक फौजदार लक्ष्मण शिंदे व पोलीस कर्मचारी संतोष मोहिते, माणिक पवार, प्रविण शिंदे, सचिन घोलप, प्रदीप सुर्वे , सिध्दराम कोळी, राजेश रणशिंग, अमजद पठाण, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, प्रमोद घाडगे, गणेश बाजारे, नामदेव अंगज, अंकुश जोगदंड, संजय दळवी, गितांजली जाधव, स्वेहल जाधव यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)