174 झोपड्यांवर “बुलडोझर’

रेल्वे विभागाकडून रामटेकडी येथील दोन्ही रेल्वे रुळालगत कारवाई

हडपसर – रामटेकडी येथे दोन्ही रेल्वे रुळालगत असलेल्या झोपड्यांवर रेल्वे विभागाने सकाळी अकराच्या दरम्यान मोठा पोलीस फौजफाटा घेऊन बुलडोझर फिरवला. यात जवळपास 174 झोपड्या पाडण्यात आल्या. ऐन थंडीत कारवाई झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यात अनेकांचे संसार उघड्यावर आले असून लहान मुले, वृद्धांचे प्रचंड हाल झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वे विभागाच्या वतीने पुणे-कोल्हापूर जाणाऱ्या मार्गावर रेल्वेचा दुसरा ट्रॅक टाकण्याचे काम सुरू झाले असून रुळा शेजारी तीस ते चाळीस वर्षांपासून झोपड्या वसलेल्या आहेत. येथील बाधीत झोपडीधारकांना रेल्वे विभागाकडून घर हटविण्यासंबंधी जून महिन्यात नोटीस बजाविली होती. काहींनी नोटीसीला जुमानले नाही, ते 12 डिसेंबरपर्यंत झोपडी स्वतः काढू असे स्टॅम पेपर लिहून देण्यात आले असल्याची माहिती रेल्वेचे शेक्‍शन इंजिनिअर एस. एच. कुंजीर यांनी दिली. ते म्हणाले, नवीन रुळाचे काम बंद झाल्याने गुरुवारी ही कारवाई करावी लागली. ही कारवाई रेल्वे विभागाचे डिव्हीजनल असिस्टंट योगेंद्र बैस, घोरपडी विभागाचे शेक्‍सन इंजिनिअर एस. एच. कुंजीर, शेक्‍सन इंजिनिअर सनथकुमार गुप्ता, आय.पी.एफ. घैलोत, स्टाफ 30चे आर.पी.एफ. शर्मा, 50 स्थानिक पोलीस, चार जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, रेल्वेचा 37 स्टाफ आदी फौजफाटा घेऊन कारवाई करण्यात आली.

या कारवाई मध्ये काही पक्‍के स्लॅबचे, विटाचे, पत्र्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले. कारवाई करताना अनेक गरीब केविलवाणा प्रयत्न करीत अनेक दिवसांपासून “पै पै’ जमा करून घर बांधलेले होते, ते पाडताना हताशपणे बघत असल्याचे चित्र दिसत होते. काहीजण कामावर गेले असताना संसार उद्ध्‌वस्त झाला. ही कारवाई होत असताना मनपाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी शेवटपर्यंत फिरकले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)