जनावरांच्या बाजारातील उलाढाल वाढली

  • चाकण बाजारभाव : कांदा ,बटाटा, भुईमूग शेंगा, लसूण यांची आवक वाढली

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा आवक वाढली व बटाटा, भुईमूग शेंगा, लसणाची आवक स्थिर झाली. तर कांद्याचे भाव उतरले तर भुईमूग शेंग, लसूण, बटाटा, भाव स्थिर झाले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक मेथी वगळता कमी झाली. या आठवड्यात शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घसरली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात पालक वगळता कोथिंबीर, शेपू मेथीची आवक कमी झाली जनावरांच्या बाजारात शेळ्या मेंढ्या, म्हशी, बैलयांच्या संख्येत वाढ झाली. तर जर्सी गाईच्या संख्येत घट झाली जनावरांच्या बाजारात एकूण उलाढाल 1 कोटी ते 45 लाख रुपये झाली. दरम्यान, या आठवड्यात उलाढाल वाढली तर एकूण उलाढाल 2 कोटी 10 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 1300 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 550 क्विंटलने वाढली भाव 2600 रुपयांवरुन 2500 रुपये झाले. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1445 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 345 क्विंटलने वाढली व कमाल भाव 700 रुपयांवर स्थिर झाले. लसणाची एकूण आवक 6 क्विंटल झाली या आठवड्यात वाढ झाली. कमाल भावही 5000 रुपयांवर स्थिर झाले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 350 क्विंटल झाली. भावात घट झाली. हिरव्या मिरचीला 2000 ते 3000 रूपये असा कमाल भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा –
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 1800
क्रमांक तीन : 1300
एकूण आवक : 1300 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 700
क्रमांक दोन : 600
क्रमांक तीन : 500
एकूण आवक – 1445 क्विंटल
लसूण :
क्रमांक एक : 5000
क्रमांक दोन : 4500
क्रमांक तीन : 4000
एकूण आवक : 6 क्विंटल
भुईमूग शेंग
क्रमांक एक : 5500
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 2800
एकूण आवक : 7 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले (रुपयांत)
टोमॅटो : 840 पेट्या ( 3000 ते 4500 ), कोबी : 210 ( 700 ते 900), फ्लॉवर : 350 पोती (1000 ते 1400), वांगी : 450 पोती (3000 ते 3800), भेंडी : 295 पोती (2500 ते 4500), दोडका : 280 (2000ते 2500), कारली : 305 डाग (3000 ते 3500), दुधीभोपळा : 65 पोती (2000 ते 3000), काकडी : 98 पोती (1500 ते 2000), गवार : 150 पोती (3000 ते 4000), फरस बी : 95 (2000 ते 3000) ढोबळी मिरची : 450 (2000 ते 2500), वालवर : 145 (2000 ते 2500), शेवगा : 150 पोती (4000 ते 5000), चवळी : 145 (1500ते 2000), वाटाणा 190 (3500 ते 5000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 14 हजार 80 जुड्या ( 400 ते 600 ), कोथिंबीर : एकूण आवक : 19 हजार जुड्या ( 200 ते 450 ), शेपू : एकूण आवक : 6 हजार जुड्या (400 ते 500), पालक : एकूण आवक : 4 हजार 500 जुड्या (300 ते 350).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 75 जर्शी गायींपैकी 40 गायांची विक्री झाली. (10 ते 65 हजार रुपये), 145 बैलांपैकी 105 बैलांची विक्री झाली. (10 ते 35 हजार रुपये), 130 म्हशींपैकी 75 म्हशींची विक्री झाली (20 ते 10 हजार रुपये), 5380 शेळ्या-मेंढ्यांपैकी 4820 शेळ्यां-मेंढ्यांची विक्री झाली. (23 ते 15 हजार रुपये).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)