170 मराठा आंदोलकांना सत्र न्यायालयाने मंजुर केला जामीन

पुणे – सकल मराठा समाजाच्या 170 आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजुर केला. पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, दर रविवारी गुन्हा दाखल असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हजेरी लावणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुणे जिल्हा सोडायचा नाही, या अटीवर सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी मंजुर केला.
पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांच्या दाव्याची सुनावणी एकाच सत्र न्यायालयात होणार आहे. आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी वारजे माळवाडी, बंडगार्डन, कोथरूड आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 170 जणांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. बचाव पक्षातर्फे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. समीर घाटगे, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, ऍड. हेमंत झंजाड, ऍड. विवेक भरगुडे, ऍड. नितीन झंजाड, ऍड. पल्लवी विराज काकडे, ऍड. शिवराज माने ऍड. अंकुश जाधव यांनी काम पाहिले. दरम्यान कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजुर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
16 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)