दिल्लीतील अर्पित हॉटेलच्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली – दिल्लीतील करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

सकाळच्या समयी सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक आग लागली. आग लागण्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. आतापर्यंत ३० जणांना वाचविण्यात जवानांना यश आले आहे. सध्या आठ वाजल्यापासून कुलिंग ऑपरेशन सुरु झाले.

https://twitter.com/ANI/status/1095125679967035395

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)